अमळनेर:- यंदा नवरात्रोत्सवातच रब्बीची तयारी सुरु झाली असून यासाठी शासनाच्या वतीने अमळनेर व तालुक्यासाठी हरभरा बियाणे अनुदानातून विक्रीसाठी ठेवले आहे.
शेतकऱ्यांसाठी हरभरा विक्री सुरु झाली आहे. नवरात्र लागल्याने कमी पाण्यात येणारे पिक म्हणून हरभरा या रब्बी पिकाकडे शेतकऱ्यांचा कल असतो. पावसाने मध्यम स्वरुपात काही ठिकाणी हजेरी लावल्याने यंदा मात्र मध्यंतरी पावसाअभावी खरीप पिकांचे नुकसान झाले असले तरी पडीक, मूग उडीदच्या शेतात हरभरा पिकाचा पीकपेरा वाढणार आहे.
यंदा रब्बी कमी – यंदा पाऊस कमी पडल्यामुळे तालुक्यात रब्बी पीकपेरा कमी प्रमाणात राहणार आहे. मात्र कोरडवाहू दोन पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हरभरा पीकाचे बियाणे दाखल झाले आहे. खाजगी कृषी सेवा केंद्रावर सातबारा उतारा आणि आधार कार्ड देऊन हे बियाणे मिळणार आहे. त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे यांनी केले आहे. त्यासाठी ९० क्विंटल बियाणे आले असून प्रति किलो २५ रु अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. फुले विक्रम आणि राजविजय असे दोन प्रकारचे वाण विक्रीस उपलब्ध आहे.