
अमळनेर:- तालुक्यातील दहिवद येथे बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान गॅस सिलेंडरचा भडका उडाल्याने एक जण गंभीर जखमी झाला तर घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

तालुक्यातील दहिवद येथील रहिवासी संतोष निंबा देसले यांच्या घरात सायंकाळी गॅस सिलेंडर स्वयंपाकासाठी जोडणी करत असतांना अचानक गॅस सिलेंडर लिक झाले. त्यातून गॅसने पेट घेतला. गॅस लिक झाल्याने सर्व घरात पसरला होता. त्यात घरात आग लागून यात पंकज संतोष देसले याने गॅस सिलेंडर विझविण्यासाठी ओल्या गोण्या टाकत असतांना आगीच्या भडक्यात त्याचा चेहरा, हात, पाठ आगीत जळाल्या त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला अमळनेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. तर या आगीत विद्युत फिटिंग, टीव्ही, कपडे, गादी यासह संसारोपयोगी इतर साहित्य खाक झाले आहे.




