अन्नदान व मुलांना कपडे वाटप, यश वर्मा यांचा उपक्रम…
अमळनेर:- येथील आशिष अलंकारचे मालक यश वर्मा यांनी वायफळ खर्च न करता मतिमंद मुलांसोबत अमळनेर युवा मित्र परिवारासोबत साध्या पध्दतीने वाढदिवस साजरा केला. त्यांनी गोरगरीब अनाथ, दिव्यांग मुलामुलींना वाढदिवसाचे औचित्य साधत अन्नदान व जे आवश्यक ते कपडे वाटप करुन आदर्श समाजापुढे ठेवला.
आपण समाजाचे देण लागतो या उद्देशाने हा समाजपयोगी उपक्रम राबविण्यात आला. अमळनेर युवा मित्र परिवार नेहमी असे कार्य करत असतात. यावेळी अमळनेर युवा मित्र परिवाराचे दिनेश तेवर, राहुल आहीरे, भावेश साळूंखे, दीपक प्रजापती, दिपक चौधरी, रिषभ जैन, साई सैंदाणे, राम सैंदाणे व रक्तदान चळवळीचे मनोज शिंगाणे उपस्थित होते. परिश्रम मतिमंद मुलामुलींची शाळेचे मुख्याध्यापक मनिष जाधव यांनी युवा मित्र परिवाराचे कौतुक केले.