
अमळनेर:- तालुक्यातील पिंपळे बु. येथील कै.सु आ पाटील माध्य विद्यालयातील विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली.

“जीवन ज्योती ब्लड बँक धुळे” येथील ज्ञानेश्वर पाटील व शिवम नरोडे यांनी शाळेतील इयत्ता ५ वी ते १० वीतील सर्व विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी व आरोग्य तपासणी केली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक ए ए देसले, जे.एस पाटील, सी.एन पाटील, डी बी पाटील,जी जे पाटील,एम पी निकम, श्रीमती शिरसाठ, श्रीमती रूपाली पाटील, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.




