खोखो स्पर्धेत नाशिक विभागाचे करणार प्रतिनिधित्व…
अमळनेर:- तालुक्यातील लोंढवे येथील स्व.आबासो. एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालयातील खेळाडू विद्यार्थिनी माहेश्वरी अशोक पाटील हिची शासनाच्या राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धांच्या निवड चाचणीसाठी पात्र ठरली आहे.
१४ वर्षीय वयोगटाच्या या राज्यस्तरीय स्पर्धा दि.४ ते ६ नोव्हेंम्बर दरम्यान जालना जिल्हा परिषदेच्या क्रीडा प्रबोधिनी येथे होणार आहेत. आता जालना येथे कु माहेश्वरी अशोक पाटील ही नाशिक विभागातर्फे सहभागी होणार आहे. नंदूरबार जिल्ह्यातील खांडबारा येथे नाशिक खो-खोच्या विभागीय स्पर्धा झाल्या होत्या.त्यात सदर खेळाडू विद्यार्थिनीची निवड करण्यात आली होती. नंदुरबार जिल्हा क्रीडाधिकारी यांचे दि ३० रोजी याबाबत आदेश प्राप्त झाले आहेत. या विद्यार्थिनीस क्रीडा शिक्षक मिलिंद पाटील,शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब जीवन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. एस. पाटील यांनी या विद्यार्थिनींचे कौतुक केले आहे.