
आंदोलनाच्या समर्थनार्थ आज सायंकाळी शहरात कँडल मार्च…
अमळनेर:- मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची तीव्रता वाढू लागली आहे. चार समाजबांधवांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. शालेय विद्यार्थ्यांनी देखील उपोषणस्थळी स्वाक्षरी करून पाठिंबा दिला. तसेच आज सायंकाळी कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले आहे.

अमळनेर तालुक्यातून देखील मराठा समाज आंदोलनाने उग्र रूप धारण केले आहे. प्रवीण संभाजी देशमुख,सचिन निंबा वाघ, हर्षल अशोक जाधव आणि जयंत महेश पाटील या चार जणांनी ३१ रोजीच्या रात्रीपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले असून उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे कळवण्यात आले आहे. त्याच प्रमाणे आंदोलनस्थळी अर्बन बँकेचे माजी संचालक सुभाष पाटील, डॉ सुमित पाटील,माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, माजी प्रशासन अधिकारी भाऊसाहेब देशमुख, खान्देश शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष जितेंद्र देशमुख, माजी नगरसेवक महेश देशमुख, वीज मंडळ कर्मचारी संघटनेचे पी वाय पाटील, दर्शना पवार, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक गोकुळ पाटील यांच्यासह सानेगुरुजी स्मारक समिती, अमळनेर तालुका फोटोग्राफर संघटना, मुस्लिम मोर्चा, धनगर समाज, देशमुख फाउंडेशन, शिवाजी हायस्कूल कर्मचारी, आदिवासी क्रांती सेना, पाडळसरे धरण जनआंदोलन समिती, मराठा सेवा संघ, प्रहार संघटना, अमळनेर तालुका सिड्स पेस्टीसाईड्स फर्टिलायझर असोसिएशन, येसूबाई बचत गट ढेकू रोड, ढेकू सिम ग्रामस्थ आदी संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
रात्री पासून तहसील आवाराबाहेर मारवड येथील भजनी मंडळाने सरकारच्या मरणाची भजने म्हटली. संगीतमय भजनामुळे आंदोलनस्थळी गर्दी जमली होती. दरम्यान अन्नत्याग आंदोलनाबाबत उपविभागीय अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व वरिष्ठांना माहीती कळवली आहे.




