अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील येथील ग्राम विकास शिक्षण मंडळ संचलित कै. न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय मारवड येथे माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या स्मृति दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
प्राचार्य डॉ. व्ही.एस.देसले यांनी लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्याही जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. हा दिवस ‘राष्ट्रीय- एकता दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. एम.के. वाघमारे यांनी केले, उपप्राचार्य प्रा.व्ही.डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मता बद्दल मार्गदर्शन केले, तसेच प्रा.डॉ. जे. ऐ. माळी यांनीही विद्यार्थ्यां समोर मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ. एस.एच.पारधी यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते..