मुलीच्या वडिलांनी अमळनेर पोलिसांत केली तक्रार…
अमळनेर:- तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय मुलीला अज्ञाताने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी अमळनेर पोलीसात दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय मुलगी इयत्ता दहावीत शिकत असून तिची आई मयत असल्याने वडिलांसोबत राहत होती. दिनांक ५ रोजी सायंकाळी वडील हे मंदिरात गेले असता मुलगी एकटी घरी होती. रात्री पावणे आठ वाजता ते परत आले असता मुलगी दिसून न आल्याने त्यांनी आजूबाजूला विचारपूस केली. तसेच नातेवाईकांकडे विचारणा केली मात्र कोणताच तपास न लागल्याने त्यांनी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार अमळनेर पोलीसात दिली आहे. पुढील तपास हेकॉ संदेश पाटील हे करीत आहेत.