अमळनेर:- तालुक्यातील हिंगोणे बु. येथे गावठी दारू तयार करून विक्री करणाऱ्या एकास मारवड पोलिसांनी पकडत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील हिंगोणे बु. येथे गावठी दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्याने मारवड पोलिसांच्या पथकाने छापा टाकला असता रावण वामन भील (वय ६१) हा त्याच्या राहत्या घराच्या बाजूला गावठी दारू तयार करताना मिळून आला. त्याठिकाणी २४ लिटर कच्चे रसायन, पाच लिटर तयार गावठी दारू आदी साहित्य मिळून आले. पीएसआय विनोद पाटील यांनी पंचनामा करत नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा जागीच नाश केला. आरोपीस ताब्यात घेवून मारवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेकॉ सुनील आगोणे हे करीत आहेत.