
अमळनेर:- तालुक्यातील पिंपळे खुर्द गृप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शोभाबाई गोकुळ पाटील यांची बिनविरोध निवड दिनांक ३० रोजी करण्यात आली.
अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील ह्या होत्या. ग्रामपंचायत सदस्य कल्पनाबाई साहेबराव पाटील, राजश्री सुधाम पाटील, मिनाबाई सतीश पाटील, संतोष बापु चौधरी,अरुण संभाजी पाटील, लोटन रुपचंद भिल आदी सदस्य तसेच माजी शेतकी संघ प्रेसिडेंट संजय पुनाजी पाटील, तंटामुक्त अध्यक्ष निंबा दला चौधरी, पोलीस पाटील डी. आर. पाटील, बापू फकिरा पाटील, विनोद नाना पाटील,सुधाम बळीराम पाटील, नामु कचरू भिल, विनोद नाना पाटील,विनोद बापू पाटील, निंबा दयाराम चौधरी, गोविंदा काशिनाथ चौधरी, जयवंतराव दगा पाटील, भाऊसाहेब आप्पा पाटील,महेंद्र गटा पाटील, पुरुषोत्तम लोटन चौधरी, नारायण दामू पाटील, मूलचंद भावडू पाटील,दुर्योधन विक्रम पाटील,निंबा खुशाल पाटील, विजय साहेबराव पाटील, युवराज डी पाटील, न्हानभाऊ हिलाल पाटील, विकास सोसायटी चेअरमन युवराज शामराव पाटील, हिरालाल सतीलाल पाटील, ज्येष्ठ व श्रेष्ठ मंडळी व कृषी विस्तार अधिकारी राजेंद्र डी सोनवणे, ग्रामसेवक किरण लकेश, स.पो.संजय पाटील, शिपाई ज्ञानेश्वर रावण पाटील उपस्थित होते. बिनविरोध निवड केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांनी व सदस्यांनी शोभाबाई गोकुळ पाटील यांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन व आभार ज्ञानेश्वर पाटील सर यांनी मानले.




