
अमळनेर:- तालुक्यातील मंगरूळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्रुती श्रीकांत पाटील यांची निवड झाली. पिठासन अधिकारी म्हणून सरपंच समाधान पारधी तर नोडल अधिकारी म्हणून दीपक पाटील यांनी काम पाहिले.
मंगरूळ गावातील पारंपरिक विरोधक दिवंगत सरपंच अनिल अंबर पाटील आणि दिवंगत सरपंच प्रकाश माधवराव पाटील या दोन्ही गटाचे सदस्य एकत्र येत श्रुती पाटील यांना उपसरपंच बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. निवड प्रसंगी अनिल प्रकाश पाटील, मुकेश रायभान पाटील, जितेंद्र भास्कर पाटील, कावेरी निरंक पाटील, छाया विजय पाटील, सुनंदाबाई प्रभाकर पाटील, सुरेखा किशोर पाटील, रमेश गंभीर भिल, ग्रामसेवक संजीव सैंदाणे, अमोल पाटील, भाईदास पाटील, भैया पाटील हजर होते. यावेळी गावकऱ्यांनी नूतन सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार केला. गावविकासासाठी दोन्ही गटाचे सदस्य एकत्र आल्याचे दोन्ही गटाच्या प्रमुखांनी सांगितले.




