गर्भाशय व स्तन कॅन्सरची तातडीने तपासणी होवून होणार निदान…
अमळनेर:- रोटरी अमरावती मिडटाऊनची मॅमोग्राफी व्हॅन 6 डिसेंबर रोजी येथील रोटरी क्लबच्या सहयोगाने अमळनेरात दाखल होत असून याद्वारे महिलांचे गर्भाशय व स्तन कॅन्सरची तातडीने तपासणी होऊन होणार निदान होणार आहे.
सुमारे ४० लाख रुपये खर्चून ही व्हॅन तयार करण्यात आली असून महिलांच्या आरोग्यासाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात ही व्हॅन फिरत आहे.विशेष करून ३५ ते ६० वर्षे वयोगटातील महिलांची तपासणी याद्वारे करण्यात येत आहे. अमळनेर येथे रोटरी क्लबच्या वतीने दि 6 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत डॉ प्रसन्न जोशी यांच्या गणेश हॉस्पिटल,बीएसएनएल हॉस्पिटल जवळ,न्यू प्लॉट, अमळनेर येथे होणार आहे.
शिबिरात विनामूल्य सेवा…
या शिबिरात स्तनाची संपूर्ण तपासणी तसेच गर्भाशयाच्या कॅन्सर करिता पेप्समिअर तपासणी तसेच मॅमोग्राफी तपासणी (स्तन कॅन्सर) दर चार महिन्यात करावयाची स्व स्तन तपासणी प्रशिक्षण यावेळी देण्यात येणार आहे.
तपासणीसाठी नावनोंदणी करणे आवश्यक असून प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे,तरी जास्तीतजास्त महिलांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन रोटरी क्लबतर्फे अध्यक्ष प्रतिक जैन, सचिव देवेंद्र कोठारी, प्रोजेक्ट चेअरमन डॉ प्रसन्न जैन, डॉ शरद बाविस्कर व डॉ प्रीतम जैन यांनी केले आहे.शिबिरार्थीनी आपली नावे रोहित सिंघवी 9422540013, राजेश जैन 9423489146, पूनम कोचर 9890185785, अविनाश अमृतकर 9422478821 व डॉ प्रसन्न जैन 9422278393 यांचेकडे नोंदवावीत.
कॅन्सरची प्राथमिक स्थिती कळण्यास सहज होते मदत…
सदर मॅमोग्राफी व्हॅन मधील मशीनच्या सहाय्याने केलेल्या तपासणीमुळे कॅन्सरची प्राथमिक स्थिती कळण्यास सहज मदत होते,रोटरी अमरावती मिडटाऊन ने अश्या तीन व्हॅन तयार केल्या असून अत्याधुनिक सर्वसुविधा युक्त अशी ही व्हॅन आहे,या व्हॅन मध्ये 40 लाख रुपये किमतीचे मॅमोग्राफी मशिन आहे,या मशीनद्वारे स्तनाच्या कॅन्सरबाबत स्क्रिनिंग होऊन प्राथमिक निदान या मशिनद्वारे होते,येथे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांना बसण्यासाठी कॅबिन,गर्भाशयाच्या तपासणीसाठी कॅबिन आहे,या गाडीत तीन सिस्टर, मॅनेजर, चालक असा पाच जणांचा स्टाफ असून जेथे ही व्हॅन जाते तेथील क्लबच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाते.