
अमळनेर:- तालुक्यातील लोंढवे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंचपदी भारती अशोक पाटील यांची तर उपसरपंचपदी चतुर नवल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
गेल्या नोव्हेंबर महिन्यात ग्रामपंचायतीची निवडणूक
बाळासाहेब जीवन पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनलने लढवली होती. त्यांनी सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. त्यात लोकनियुक्त सरपंचपदी भारती अशोक पाटील यांची निवड झाली होती. त्यानंतर 1 डिसेंबर रोजी उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. अध्यासी अधिकारी म्हणून सरपंच भारती अशोक पाटील यांनी तर निरीक्षक म्हणून बरुटकर यांनी व ग्रामसेवक माळी यांनी कामकाज पाहिले. एक हाती सत्तेमुळे चतुर नवल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी ग्रामपंचायत सदस्य दिलीप गोरख पाटील, ज्ञानेश्वर मन्साराम पाटील, नारायण अभिमान पवार, आचळबाई बन्सीलाल भागवत, मालुबाई युवराज पाटील, मिनाबाई जिजाबराव पाटील, मोनाली मुकेश पाटील, मालती सुनील खैरनार आदी सदस्य उपस्थित होते. यावेळी पॅनल प्रमुख बाळासाहेब पाटील, अशोक पाटील,माजी सरपंच विजय पाटील, कैलास खैरनार, कैलास पाटील, वाल्मीक पाटील, संतोष पाटील, अर्जुन धनगर, दिनकर पाटील, भटू पाटील, देविदास पाटील, शांताराम पाटील, सुरेश पाटील, बन्सीलाल भागवत, विनायक पाटील तसेच संजय पाटील, चतुर नाईक, लक्ष्मण नाईक,प्रभाकर नाईक, अशोक खैरनार, सुनील पाटील, लोटन पाटील, प्रकाश पाटील, भगवान पाटील, अविनाश पाटील, मुकेश पाटील, रवींद्र पाटील, निळकंठ पाटील, राजमल पाटील,भाटेश्वर पाटील, जितेंद्र पाटील, मनोहर पाटील, सतीश पाटील,प्रवीण पाटील, बाळू पाटील, साहेबराव पाटील, भगवान पाटील, रोहिदास कदम, महादू कदम, पोलीस पाटील प्रभाकर पाटील आदी उपस्थित होते. प्रतोद बळीराम अनिल पाटील, अंकुश पाटील, पुरुषोत्तम पाटील, क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष दीपक चौधरी, तालुका अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. याप्रसंगी गावातील नागरिक अबाल वृद्ध महिला वर्ग तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.




