
अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल…
अमळनेर:- तालुक्यातील सारबेटे येथून २४ हजार रुपये किमतीच्या तीन गायी अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची घटना २९ ते ३० दरम्यान घडली.
विशाल जितेंद्र ब्रम्हे , विजय लुकडू पाटील व गणेश नत्थु ब्रम्हे या तिघांनी आपापल्या घराबाहेर बांधलेल्या प्रत्येकी एक प्रमाणे तीन गायी ३० रोजी पहाटे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. विशाल याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास रामकृष्ण कुमावत करीत आहेत.




