खोकरपाट गावापासून राज्यव्यापी शिबिराचा केला शुभारंभ…
अमळनेर:- पशु संवर्धन विभाग जळगावच्या वतीने १ ते १९ डिसेंबर दरम्यान राज्यव्यापी वंध्यत्व निवारण शिबिर घेण्यात येत आहे. खोकरपाट या गावापासून शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.
अमळनेर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी प्रतिभा कोरे व सहकाऱ्यांनी खोकरपाट येथे गुरांना जंतनाशक औषधी , गोचीड औषधी आणि वंध्यत्व निवारण उपचार केले. ग्रामीण भागात विविध ठिकाणी १९ दिवस शिबिर घेण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांनी लाभ घेऊन आपल्या जनावरांवर उपचार करून घ्यावेत असे आवाहन पशु वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.
Related Stories
December 22, 2024