
अमळनेर:- शहरातील पाटील गढी परिसरात आयोजित श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहास मोठा प्रतिसाद मिळत असून ११ डिसेंबर रोजी सप्ताहाचा समारोप होणार असून त्यादिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील भालेराव नगर येथील पाटील गढीतील रहिवासी भिकाजी विक्रम साळुंखे व परिवाराकडून ह्या भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून वे.मु.श्री. अविनाशजी हरिश्चंद्र जोशी (नंदुरबारकर) यांच्या सुमधुर वाणीतून भागवत कथा ऐकण्यास परिसरातील भाविकांची विशेषतः महिला वर्गाची मोठी गर्दी होत आहे. ४ डिसेंबर पासून ह्या सप्ताहास सुरुवात झाली असून ८ रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव व ११ रोजी सप्ताहाची सांगता होणार आहे.




