
अमळनेर:- तालुक्यातील अमळगाव येथील २५ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याने मारवड पोलिसांत पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळगाव येथील प्रमोद सुरेश चौधरी (वय २५) हा दिनांक ६ रोजी रात्री ८ वाजता मित्राला भेटून येतो असे सांगून घरातून निघाला. मात्र रात्री तो घरी परतला नाही आणि सकाळी मित्र आणि नातेवाईकांकडे शोध घेतला असता तो मिळून आला नाही. त्यानंतर आजपावेतो तो घरी परत न आल्याने सुरेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ संजय पाटील हे करीत आहेत




