
अमळनेर:- शहरातील रेल्वे स्थानकाच्या टॉयलेटमध्ये मृतदेह आढळल्याची माहिती मिळाल्याने घटनास्थळी लोहमार्ग पोलिसांनी पाहणी केली असता अनोळखी पुरुषाचे प्रेत असल्याचे समजले असून त्याची ओळख पटविण्याचे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.
दि. ६ रोजी अमळनेर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. २ वरील शौचालयात सकाळी ९.४४ वाजता बेवारस मृतदेह आढळला आहे. सदरील व्यक्ती कोणत्यातरी दिर्घ आजाराने मरण पावला आहे. सदरील व्यक्तीच्या ओळख पटविण्याचे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे पुढील घटनेचा तपास पो.ना दिनकर कोळी करीत आहे.




