
अमळनेर:- शहरातील तेली समाज बांधवांनी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती ८ डिसेंबर रोजी साजरा केली. संताजी चौकातील संताजींच्या मंदिरात प्रथम सकाळी साडेनऊ वाजता सामूहिक पूजन करण्यात आले दुपारी चार वाजता पालखी सोहळा व भव्य शोभायात्रा संताजी चौक ते वाडी चौक, सराफ बाजार, दगडी दरवाजा, पाच कंदील चौक ,मुंबई गल्ली,तेली भुवन येथे थोडा वेळ थांबून पुढे कुंटे रोड, झामी चौक, माळी वाडा येथील संताजी महाराज मंदिर पर्यंत करून पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली.

पालखी पूजन माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले त्यांच्या सोबत माजी उपनगराध्यक्ष अनिल महाजन, धनंजय महाजन, पंकज चौधरी, बाळासाहेब संदांनशिव आदी उपस्थित होते. सदर पालखी उत्सवास समाजातील सर्व महिला, पुरुष तसेच वरिष्ठ समाजसेवक राजाराम वामन चौधरी, भोजू वामन चौधरी, सुभाष अण्णा चौधरी, मा. प्राचार्य प्रा. एस आर चौधरी, प्रा.ई.टी चौधरी, तेली समाजाचे अध्यक्ष संजय सुदाम चौधरी, सुरेश सखाराम चौधरी, एकनाथ महादू चौधरी, अरुण धोंडू चौधरी, पराग अरुण चौधरी, सुरेश रतन चौधरी, संजय भिकन चौधरी, आबा नामदेव चौधरी, आत्माराम जगन्नाथ चौधरी, नरेंद्र विष्णू चौधरी, रविंद्र बाबूराव चौधरी, लक्ष्मण नामदेव चौधरी, हिम्मत सदाशिव चौधरी, अरुण रतन नेरकर, शांताराम नारायण चौधरी, ललित मधुकर चौधरी, सोनू भटू चौधरी, सुनील विश्वास चौधरी, जगदीश लोटन चौधरी, श्रीराम भगवान चौधरी, वामन सुकलाल चौधरी, जे के चौधरी, हरी रतन चौधरी, काशिनाथ दयाराम चौधरी, रवींद्र राजाराम चौधरी, अरुण जगन्नाथ चौधरी, राजेन्द्र जगन्नाथ चौधरी, अरुण दशरथ चौधरी, विलास सुकदेव चौधरी, नामदेव सदाशिव चौधरी, नंदलाल भगवान चौधरी, सुभाष राजाराम चौधरी, अंबादास चौधरी, श्रावण चौधरी,तसेच कार्यालयीन सेवक यशवंत दशरथ चौधरी, अमृत आनंदा चौधरी, भिका लखा चौधरी, धनु संजय चौधरी तसेच संताजी महिला तेली मंडळाच्या अनेक महिला पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.




