
अमळनेर:- तालुक्यातील चौबारी येथे गावठी दारू विकणाऱ्या महिलेला मारवड पोलिसांनी रंगेहाथ पकडत गुन्हा दाखल केला आहे.
सपोनि शितलकुमार नाईक यांच्या आदेशावरून मारवड पोलिसांच्या पथकाने चौबारी येथे छापा टाकला असता वैजयंताबाई वडर (वय ५३) ही गावठी दारू विक्री करताना आढळून आली. तिच्याकडे १७ लिटर तयार गावठी दारू मिळून आल्याने नमुने घेवून उरलेल्या साहित्याचा नाश करण्यात आला. मारवड पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ सचिन निकम हे करीत आहेत.





