
अमळनेर:- तालुक्यातील प्र. डांगरी येथील सरपंचपदी ललिता महेंद्र शिसोदे यांची काल बिनविरोध निवड करण्यात आली.
काल ११ रोजी सरपंच पदाची निवड पार पडली. यावेळी ललिता महेंद्र शिसोदे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून सर्कल सुरेश बोरसे यांनी काम पाहिले. यावेळी तलाठी गणेश पाटील, ग्रामसेवक शामराव धनगर, ग्रा.प.कर्मचारी व उपसरपंच रतीलाल भील व ग्रामपंचायत सदस्य मिनाबाई पाटील, कल्पना शिसोदे, दिपाली शिसोदे, जाकियाबी पठाण, योगेश शिसोदे उपस्थित होते. यावेळी दिनेश शिसोदे, सुनील शिसोदे, लक्ष्मण पाटील, शशी पाटील, प्रशांत शिसोदे, रवींद्र कोळी, दीपक कुमावत, धनराज भोई, सचिन पाटील, स्वप्निल सैंदाणे, चंद्रकांत शिसोदे, रोहित शिसोदे, जयेश वाडीले, महेंद्र शिसोदे आदी ग्रामस्थानी नूतन सरपंच यांचा सत्कार केला. यावेळी नूतन सरपंच ललिता महेंद्र शिसोदे यांनी सर्वांचे आभार मानले.




