
युवा केसरी स्पर्धेसाठी अमळनेर तालुका संघाची निवड जाहीर…
अमळनेर:- युवा केसरी स्पर्धेसाठी अमळनेर तालुका संघाची निवड करण्यात आली. तालुका कुस्तीगीर संघाकडून जी. एस. हायस्कूलमध्ये निवड चाचणी घेण्यात आली.
मुख्याध्यापक बी. एस. पाटील यांच्या हस्ते बजरंगबलीच्या प्रतिमेचे पूजन करून आखाडा पूजन करण्यात आले. या वेळी एस.बी.निकम, ए डी भदाणे, पैलवान संजय कौतिक पाटील, शब्बीर पैलवान, प्रताप शिंपी संजय पैलवान, रावसाहेब पाटील, भरत पवार, प्रवीण पाटील, कुस्तीगीर संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळु पाटील उपस्थित होते. सूत्र संचलन एस पी वाघ यांनी केले.
अमळनेर तालुका संघ पुढील प्रमाणे:-
गादी गट – कुमार गट प्रणव विजय ठाकरे ४५ किलो, मुकेश बावीसकर ४८ किलो,ऋतिक पाटील ५१ कि, देवराज पाटील ५५ साहील पाटील ६५, दर्शन पाटील ७१ कि,
१८ ते २० युवागट पुढील प्रमाणे:-
प्रतिक पाटील ५७ कि, भाग्येश जाधव ६५ कि ,हर्ष प्रताप शिपीं ७० कि, निखील गुरव ७४ , शाहीर खाटीक ८६ किलो, निजाम अली हसन ९२ किलो
वरिष्ठ ग्रीक रोमन ओपन गट १८ वर्षावरील :-
भावेश कोळी ५५ कि, मयुर पाटील ६० कि, संदीप पाटील ६३ कि, योगराज चोधरी ६७ किलो, ऋषिकेश पाटील ७२ किलो, पवन पाटील ७७ किलो, शुभम शिंदे ८२, हरी शेळके ९७, तुषार गुरव ९७ या पैलवानांची निवड करण्यात आली.
पंच म्हणून रावसाहेब पैलवान हसन पैलवान यांनी काम पाहीले व गुणलेखक म्हणून संजय पाटील व सुनील वाघ यांनी काम पाहीले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळु पाटील, हरी शेळके, प्रशांत पाटील, अलोक सोनवणे, तुषार गुरव, आबा शिंदे, प्रवीण कुमार पाटील यांनी सहकार्य केले. जिल्हास्तरीय सामने चाळीसगाव येथे क्रीडा संकुलात १६ रोजी होणार आहेत.




