
विविध स्पर्धांची व कार्यक्रमांची असणार रेलचेल…
अमळनेर:- अमळनेर महिला मंचने सलग चार वर्षे विविध दर्जेदार स्पर्धा व कार्यक्रम घेतले. यंदाही पालिका व अमळनेर महिला मंच यांच्यावतीने सावित्रीबाई महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
गुरुवारी पालिका सभागृहात सकाळी ११ वाजता अमळनेर महिला मंच व पालिकेच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, प्रशासन अधिकारी संजय चौधरी, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, महिला मंचच्या डॉ अपर्णा मुठे, तिलोत्तमा पाटील, सरोज भांडारकर, कांचन शाह, शीला पाटील, पद्मजा पाटील, वसुंधरा लांडगे, उज्वला शिरोडे, रंजना देशमुख यांची उपस्थिती आदी उपस्थित होते. यंदा देखील दर्जेदार कार्यक्रम होणार आहेत. विविध स्टॉल लावून बचत गटांना उत्पादन विक्रीस वाव देण्यात येणार आहे. विविध कार्यक्रम यात घेण्यात येतील गेल्या काही वर्षात उत्साहात कार्यक्रम झाले. यंदाही हा उत्सव पण तसाच होईल, सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रशांत सरोदे यांनी केले.
तर महिला मंचच्या अध्यक्षा अपर्णा मुठे यांनी माहिती देतांना सांगितले की, यावेळी सलग चार वर्षे महिला उत्सव साजरा झाला आहे. सर्व जाती धर्मिय महिलांचा यात सहभाग असतो. काही स्पर्धांची तयारी करावी लागते म्हणून लवकर सुरुवात करीत आहोत. स्पर्धा २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत वॉकेथॉन स्पर्धा, दोरीवरच्या उड्या, निबंध लेखन, रनिंग, सायकलिंग, योगासन, वारली पेंटिंग अशा विविध स्पर्धा यात ठेवण्यात येणार आहेत. यासह विविध कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. ३१ डिसेंबर रोजी महोत्सव व स्टॉल उदघाटनसह कथ्थक नृत्य, रंगारंग कार्यक्रम आयोजित केला आहे. भजन, नाट्य स्पर्धा, लावण्यवती लावणी, महिला ऑर्केस्ट्रा लावणी नृत्य स्पर्धा, कार्यक्रम १ जानेवारी ते ३ जानेवारी या काळात विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. स्टॉलचे उद्घाटन आणि स्टॉल फक्त महिलांच्या बचत गटांना देण्यात येणार आहेत. सूत्रसंचालन आभार प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांनी केले.




