
वाजत गाजत आतिषबाजी करून काढली मिरवणूक…
अमळनेर:- खेलो इंडियाच्या राष्ट्रीय पॅरा पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक मिळवणाऱ्या दिनेश बागडेची अमळनेरकरांनी वाजत गाजत आतिषबाजी करत जल्लोषात मिरवणूक काढली.
भारत सरकारच्या खेलो इंडिया स्पर्धेतून अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या दिव्यांग दिनेश बागडे याने मिळवलेल्या यशाबद्दल अमळनेरात क्रीडा प्रेमींनी आनन्द व्यक्त केला. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी देखील दिनेशचा सत्कार केला. सत्कार प्रसंगी विक्रांत पाटील, दर्शना पवार, महेंद्र महाजन, मनोज शिंगाणे, किशोर माळी, मुख्याध्यापक एस डी देशमुख, डी ए धनगर,प्रा डॉ लीलाधर पाटील, प्रा अशोक पवार हजर होते.
तर सायंकाळी विजय मारोती मंदिरापासून महाराणा प्रताप चौक, न्यायालय, मंगलमूर्ती चौक ते छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहापर्यंत जीपवर वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी माजी आमदार शिरीष चौधरी, खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन डॉ अनिल शिंदे, प्रा सुभाष पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती धनगर पाटील, डॉ दिनेश महाजन, राहुल कंजर, योगेंद्र बाविस्कर, मुख्याध्यापक प्रकाश पाटील, योगेश महाजन, डॉ नितेश माचरे, सागर विसपुते, टोनी बागडे, गोपी, पंकज कंजर, राकेश अभांगे, सुरज अभंगे यांच्यासह क्रीडा प्रेमी सहभागी झाले होते.




