
अमळनेर:- येथील बाबुलाल यशवंत पाटील यांची नुकतीच एलआयसी अमळनेर विमा शाखेत एमडीआरटी (USA) साठी चौथ्यांदा निवड झाली असून अमळनेर शाखेचा इतिहासात चौथ्यांदा एमडीआरटी करणारे एकमेव एजंट ठरले आहेत. ते अमेरिका जाण्यासाठी पात्र ठरले आहे.
एमडीआरटी एजंट म्हणजे तो 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या कालावधीत दहा लाख डॉलर्स इतका विमा व्यवसाय खरेदी करतो. एमडीआरटी सदस्यता हि आंतरराष्ट्रीय जीवन विमा आणि आर्थिक सेवा व्यवसायात उत्कृष्ट म्हणून ओळखली जाते. त्यात बाबुलाल पाटील यांची अमळनेर शाखेतून सलग चौथ्यांदा निवड झाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनदंन होत आहे. 1927 मध्ये स्थापित झालेल्या, मिलियन डॉलर राउंड टेबल (एमडीआरटी), द प्रीमिअर असोसिएशन ऑफ फायनान्शियल प्रोफेशनल्स हे 78 देशांतील 430 पेक्षा अधिक कंपन्यांमधील जगातील 36,000 अग्रणी जीवन विमा आणि वित्तीय सेवा व्यावसायिकांचे आंतरराष्ट्रीय, स्वतंत्र संघटना आहे. एमडीआरटी सदस्य अपवादात्मक व्यावसायिक ज्ञान, कठोर नैतिक आचरण आणि उत्कृष्ट ग्राहक सेवा प्रदर्शित करतात. याकामी बाबुलाल पाटील यांनी सन 2020 या वर्षात अमळनेर शाखेत प्रथम येण्याचा बहुमान मिळाला होता सण 2021 दुसऱ्यांदा आणि सण 2022 तिसऱ्यांदा आणि 2024 मध्ये चौथ्यांवेळेस एमडीआरटीसाठी त्यांची निवड झाली. त्यांच्या निवडीसाठी वरीष्ठ शाखाधिकारी गोपाल सोलंकी, विकास अधिकारी तुषार झेंडे, संजय शेटे यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या या निवडीबद्दल चोपडा शाखेतील शाखाधिकारी महेंद्र ठाकूर, शाखेतील सुमित कुमार, हिमांशू सिंग,तुषार झेंडे ,मिलिंद मिसर, अजय रोडगे ,नितिन पाटील, गणेश अकनगीरे, नीरज मोरे, राहुल शिरसाठ, निवृत्ती बोडके, संधान साहेब, भगत साहेब, सरला पाटील, अपर्णा
मुळे, दीपा बाग, अश्विनी ब्राम्हणकर, प्रमोद शिंपी, केशव चव्हाण, नैतिक सोनार,विनोद आगलावे, विनोद बडगुजर,भूषण पाटील, दामू धनगर, विशाल खर्डेकर, पियुष शहा, सुदर्शन सोनवणे,मनोज नेरकर, अभिमन्यू तातोडे, विकार शेख,नीरज मोरे, नितीन चव्हाण,दीपक भोई, संदीप कुलकर्णी, संभाजी पाटील, शैलेश चौधरी, वैभव पाटील, मिलिंद मोरे यांच्यासह देशदूतचे संपादक हेमंत अलोने व्यावसथापक विजय महाजन, पत्रकार बांधव, कळमसरे ग्रामस्थ व अनेकांनी अभिनदंन केले आहे. यावेळी प्रास्ताविक उपशाखाधिकारी सुमीत कुमार यांनी केले तर वरीष्ठ शाखाधिकारी गोपाल सोलंकी विकास अधिकारी तुषार झेंडे, निवूत्त विकास अधिकारी संजय शेटे, पत्रकार शामकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर आभारप्रदर्शन सहाय्यक प्रशासन अधिकारी हिमांशू सिंग यांनी केले.




