
शहर भाजपाची पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी…
अमळनेर:- येथील नगरपरिषदेने सुरु केलेले वाढीव मालमत्ता मोजणीचे काम स्थगित (बंद) करावे या मागणीचे निवेदन अमळनेर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने पालिकेच्या मुख्याधिकारीना देण्यात आले.
भाजपाचे शहराध्यक्ष विजयसिंग पंडित पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदरचे निवेदन देण्यात आले.यात म्हटले आहे की, अमळनेर नगरपरिषदेने त्यांच्या हद्दीतील वाढीव मालमत्ता मोजणीची प्रक्रिया सुरु केली आहे. तदनतर आपण मालमत्ता करात वाढ करणार यात काही शका नाही.दरम्यान महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्यागिक नगरी अधिनियमन, १९६५च्या कलम १६९ नुसार कोणत्याही व्यक्तीस करासंदर्भात अपील करावयाचे असल्यास प्रथम नगरपरिषदे कडे असलेल्या अपील समितीकडे अपील करण्याची तरतूद असून, त्यामध्ये जिल्हाधिकारी किवा प्रधीकृत अधिकारी हे पदसिद्ध अध्यक्ष असून नगरपरिषदेचे अध्यक्ष हे पदसिद्ध सदस्य तसेच महिला व बाल कल्याण समिती अध्यक्ष हे पदसिद्ध सदस्य, नगरपरिषदेतील विरोधी पक्षनेता हे सदस्य राहतील, अशी तरतूद आहे. तथापि अमळनेर नगरपरिषदेमध्ये सध्या प्रशासक असल्यामुळे व तेथे सदस्यांची परिषद नसल्याने अपील समिती अस्तित्वात नाही.तसेच वरील बाबी विचारात घेऊन अमळनेर नगरपरिषदेकडून सुरु असलेल्या वाढीव मालमत्ता मोजणीच्या प्रक्रियेस नगरपरिषदेतील निवडणुक होऊन निवडून आलेली अपील समिती अस्तित्वात येईपर्यंत स्थगिती दयावी अशी विनंती यात करण्यात आली आहे.
सदर निवेदनावर विजय सिंग पाटील तसेच हरचंद लांडगे,उमेश वालहे,महेश पाटील,सोमा ठाकूर, पंकज भोई,अशोक पाटील, योगीराज चव्हाण,दीपक भोई, गोकुळ परदेशी, रमेश पाटील, दिलीप ठाकूर,निनाद जोशी, शिवकिरण बोरसे,सुनील भोई, योगेश सुतार,अशपाक शेख, देविदास देसले,राकेश पाटील, चंद्रकांत कंखरे,देवा लांडगे, समाधान पाटील,विजय बारी, चंद्रशेखर कुलकर्णी, दिलीप पाटील उपस्थित होते.




