
पिंपळे ता.अमळनेर:- अवकाळी पावसानंतर आता दोन दिवसापासून वारे आणि ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
पंधरा दिवसाआधी अवकाळी पाऊस व धुके यामुळे गहू, हरभरा, कांदा, भाजीपाला पिके, ज्वारी, दादर, मका यावर अळ्यांचा प्रादुर्भाव व किडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना औषध फवारणी करावी लागली. त्यानंतर आता पुन्हा ढगाळ वातावरण असल्यामुळे बोंड अळी आणि रसशोषक कीड वाढीस लागू शकते.




