
गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी विद्यार्थी, पालक व शिक्षकांना केले आवाहन…
अमळनेर:- तालुक्यातील सहावी ते बारावी च्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी व शिक्षकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवादात्मक परीक्षा पे चर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन प्रश्न स्पर्धेत सहभागी व्हा, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी केले आहे.
केंद्रीय शिक्षा मंत्रालयातर्फे सालाबादाप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विद्यार्थी ,शिक्षक व पालकांशी संवादात्मक परीक्षा पे चर्चा दिल्ली येथील तालकोटरा स्टेडीयम वर होणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांची निवड १२ डिसेंबर ते १२ जानेवारी दरम्यान करण्यात येणार आहे. सहावी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी ,पालक व शिक्षकांसाठी https://innovateindia.mygov.in/ppc ही लिंक उपलब्ध करण्यात आली असून त्यावर नोंदणी करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. या उपक्रमात सहभागी विद्यार्थी पालक शिक्षक यांना एनसीईआरटी संचालकांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मिळणार आहे. मोठ्या शाळांमधून देखील हा उपक्रम दाखवला जाणार आहे. सर्व शिक्षा अभियान व प्रधानमंत्री पोषणशक्ती अभियान अंतर्गत कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त शाळा व विद्यार्थी नोंदणीसाठी नियुक्त करण्याचे निर्देश शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत.




