
नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक रवींद्र नाईक यांची उपस्थिती…
अमळनेर:- तालुक्यात साकारणाऱ्या क्रीडा संकुलात संभाव्य सुविधा आणि तालुक्याच्या दृष्टीने लागणारे साहित्य यासंदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी तथा नाशिक विभागाचे क्रीडा उपसंचालक रवींद्र नाईक यांच्या अध्यक्षतेखाली जी एस हायस्कूलमध्ये क्रीडा शिक्षक व क्रीडा प्रेमींची आढावा बैठक संपन्न झाली.
राज्याचे पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी क्रीडा संकुलाच्या दोन कोटी रुपयांच्या कामास सुरुवात होत आहे. व त्यांनतर येणाऱ्या एक कोटीच्या निधीत संकुलात कोणत्या सुविधा आणि यंत्रणा उपलब्ध असाव्यात याबाबत क्रीडा शिक्षक आणि क्रीडा प्रेमी यांना विचारात घेऊन पुढील कामे करावीत असे निर्देश दिले होते. तसेच क्रीडा विभागातर्फे काय अपेक्षित आहे याचा आढावा घेण्याबाबत जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी ही बैठक बोलावली होती. यावेळी तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी, तालुका क्रीडा संघटना अध्यक्ष सुनील वाघ, कार्याध्यक्ष संजय पाटील, प्रा. अमृत अग्रवाल, महेश माळी, रत्ना सोनवणे, जे. व्ही. बाविस्कर, एम.व्ही. पाटील, जयेश म्हासरे,बी एन पाटील, पैलवान रावसाहेब पाटील, पैलवान संजय पाटील, पैलवान बाळू पाटील हजर होते.
यावेळी रनिंग ट्रॅकला अल्युमिनियम इंनर, आधुनिक जिम, खो खो कबड्डीच्या इनडोअर मॅट,ज्यूडो,कुस्ती मॅट असाव्यात यावर चर्चा करण्यात आली. आढावा बैठक आटोपल्यावर ४९ व्या कुमार गट राज्य अजिंक्य स्पर्धेसाठी निवड झालेल्या जी एस हायस्कूल च्या जयेश गुलाब धनगर व कृष्णा संजय महाजन यांचा जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक बी एस पाटील, उपमुख्याध्यापक सी एस पाटील, एस बी निकम, ए डी भदाणे, डी एम दाभाडे, एस आर शिंगाणे,के पी पाटील, सी एस सोनजे, एस एम पवार हजर होते.




