
किसान काँग्रेसकडून जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन…
अमळनेर:- तालुक्यात २०२१ साली खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे अनुदान मिळावे अश्या मागणीचे निवेदन किसान काँग्रेसकडून जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांना देण्यात आले.
सन २०२१ च्या खरीप हंगामात तालुक्यातील पाच मंडळात अतिवृष्टी, दोन मंडळात अवकाळी पाऊस आणि एका मंडळात गुलाबी वादळामुळे शेतीपिकांचे सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते. त्यामुळे महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात आले होते. मात्र मदत न मिळाल्याने किसान काँग्रेसकडून जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून निवेदन देतेवेळी प्रा. सुभाष पाटील, डॉ. अनिल शिंदे, धनगर पाटील आदी उपस्थित होते.




