
जायन्ट्स ग्रुप ऑफ विरांगना सहेली ग्रुपकडून आयोजन…
अमळनेर:- जायन्ट्स ग्रुप ऑफ विरांगना सहेली ग्रुपच्या अध्यक्ष दिपिका सोनवणे यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त मारवड येथे अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने मारवड गावात जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुरेश बोरसे यांनी चमत्कार सादरीकरण केले. तर अनिसचे जिल्हा प्रधान सचिव सुनील वाघमोडे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच आशाबाई भील, ग्रामपंचायत पदाधिकारी, पत्रकार डॉ. विलास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. दिनांक १५ डिसेंबर रोजी शासकीय आयटीआय कॉलेज जवळील वस्तीत लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. तर १७ डिसेंबर रोजी अमळनेर येथे हरिओम नगर,ढेकू रोड येथेही अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत जनजागृती यात चमत्कार सादरीकरण तर वैज्ञानिक दृष्टिकोनावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी डॉ.दिनेश पाटील (कार्याध्यक्ष अमळनेर शाखा महा.अनिस) उपस्थित होते. तसेच युनिक क्लासेसचे विद्यार्थी, पालकवर्ग व विरांगना ग्रुपचे सौ. कमल पाटील,सौ.रुपाली पवार, सौ.सुनंदा निकम, सौ.शैलजा सोमवंशी, सौ.सुदेशना पवार, सौ.रेखा पवार, सौ.कल्पना माळी, सौ.सुरेखा पाटील उपस्थित होते.




