अमळनेर:- तालुक्यातील मुंगसे येथील डॉ. पल्लवी चंद्रकांत कोळी हीची एमडी मेडीसिनसाठी म्हैसूर येथील गवर्नमेंट कॉलेजमध्ये निवड झाली असून तिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
तालुक्यातील मुंगसे येथील चंद्रकांत तानकू कोळी हे शिक्षक म्हणून श्रीरामपूर येथे कार्यरत असून त्यांची मुलगी डॉ पल्लवी हिने उत्कृष्ट यश संपादन करत एमडी मेडिसीनला गवर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हैसूर या ठिकाणी प्रवेश मिळवला आहे. तिचे प्राथमीक शिक्षण मुंगसे जिल्हा परिषद शाळेत तर माध्यमिक शिक्षण श्रीरामपूर एज्यू सोसायटीचे हायस्कूल या ठिकाणी पूर्ण केले असून तीचे पदवीचे शिक्षण (बीएएमएस) नाशिक या ठिकाणी झाले आहे. चंद्रकांत कोळी यांच्या दोन्ही मुली वैद्यकीय व्यवसायाचे शिक्षण घेत आहेत. गावातील सरपंच निलेश कोळी, पोलिस पाटील भारत पुंडलिक निकुंभ यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.