
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील माळण नदी पात्रात दिनांक २६ रोजी सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. रवीकिरणजी महाराज यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
मारवड येथील कै. सुभाष माधवराव साळुंखे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. रवीकिरणजी महाराज, दोंडाईचेकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दिनांक २६ रोजी रात्री आठ वाजता करण्यात आले आहे. मारवड येथील विकासो आवारात सदर कीर्तनाचा कार्यक्रम पार पडणार असून भाविकांनी उपस्थिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.




