
पीकविम्याची अग्रिम रक्कम मिळवून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी मानले आभार…
अमळनेर:- कापूस पिकाची अग्रिम पीक विम्याची रक्कम मिळवून दिल्याबद्दल प्रा. सुभाष पाटील व सहकाऱ्यांचा ठिकठिकाणी सत्कार करण्यात येत आहे.
तालुक्यातील शिरसाळे, अंचलवाडी, पळासदडे, एकरुखी, लोंढवे येथे ग्रामस्थांनी सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शिरसाळे येथे तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कापूस पिकाची अग्रिम पिक विमा रक्कम मिळवून दिल्याबद्दल ग्रामस्थांनी किसान काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. सुभाष पाटील व इतर मान्यवरांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सरपंच युवराज पाटील हे होते. प्रा. सुभाष पाटील व त्यांचे सहकारी जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, डॉ. अनिल शिंदे, धनगर पाटील, मयूर पाटील, गिरीश पाटील, बाजार समिती संचालक नितीन पाटील,विकासो चेअरमन दिनेश पाटील व ग्रापं सदस्य उपस्थित होते. वावडे येथील पोलिस पाटील दत्ता ठाकरे, लोण येथील पोलीस पाटील व पिंपळे येथील सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदाम चौधरी यांनी केले.




