
अमळनेर:- पू सानेगुरुजी माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
सानेगुरुजी पतपेढीच्या ७५५ मतदारांपैकी ५६६ मतदार पात्र ठरले आहेत. तात्पुरत्या मतदार यादीवर हरकत घेण्याची मुदत २६ डिसेंबर ते २ जानेवारी २०२४ असून सहायक निबंधकांकडे हरकत नोंदवायची आहे. ५ जानेवारीला सहायक निबंधक आलेल्या हरकतींवर निर्णय जाहीर करतील व ८ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करतील. त्यांनतर रीतसर निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल.
दोन वर्षांपूर्वीच संचालक मंडळाची मुदत संपलेली होती. मात्र कोरोनामुळे आणि सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबल्यामुळे संचालक मंडळाला दोन वर्षे जादाचा कार्यभार उपभोगता आला. तब्बल सात वर्षांनंतर निवडणूक जाहीर झाल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता लागून आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील महाजन काम पाहत आहेत.




