
अमळनेर:- तालुक्यातील कळमसरे येथे गावठी दारू विक्री करणाऱ्या एकास मारवड पोलिसांनी पकडत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कळमसरे येथे गावठी दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्याने मारवड पोलिसांच्या पथकाने भेट दिली असता कळमसरे ग्रामपंचायतीच्या मागे एक इसम कॅन घेवून बसलेला दिसल्याने छापा टाकून पकडले. त्याचे नाव राकेश हिम्मत चौधरी (वय २९) असे असून त्याचेकडे दोन हजार रुपये किमतीची २० लिटर गावठी दारू मिळून आली. नमुने घेवून उरलेल्या दारूचा नाश करत मारवड पोलीसात मु.प्रो. ॲक्ट ६५ ई अन्वये गुन्ह्याची नोंद करीत आहेत. पुढील तपास पोना मुकेश साळुंखे हे करीत आहेत.




