
आज होणार उद्घाटन,चार दिवस होतील रंगारंग कार्यक्रम
अमळनेर-अमळनेर महिला मंच ट्रस्ट आणि अमळनेर नगरपरिषद याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संखीच्या कलागुणांना वाव देणारा चार दिवसीय महिला महोत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आज दि 31 डिसेंबर पासून सुरु होत आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते दुपारी साडेतीन वाजता महोत्सव आणि स्टॉल चे उदघाटन होणार आहे. या प्रसंगी मदत आणि पुनर्वसन मंत्री मा. अनिल भाईदास पाटील,प्रमुख पाहुणे म्हणून मा जि.प.सदस्या सौ जयश्री अनिल पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तर विशेष उपस्थिती माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, मा.आमदार स्मिताताई वाघ,खा शि मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ अनिल शिंदे, प्रांत अधिकारी महादेव खेडकर,तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांची असणार आहे.आज 31 रोजी पहिल्या दिवशी कथक नृत्य विशारद शिवानी जोशी यांच्या बॉलिवूड गाण्यांवार कथक डान्स चा कार्यक्रम होणार असून यानंतर रुपालीताई चाकणकर यांची प्रकट मुलाखत होईल.1 तारखेला दुपारी 3.30 वाजता भजन स्पर्धा,2 तारखेला दुपारी 3.30 वाजता नाट्य स्पर्धा आणि 3 तारखेला दुपारी 3.30 पासून सुर तेच छेडीता या महिला ऑर्केस्ट्रा मध्ये लावण्यावती लावणी हा बहारदार कार्यक्रम आणि बक्षीस समारंभ होणार आहे तरी चार दिवस होणाऱ्या कार्यक्रमांचा महिलांनी आनंद घ्यावा असे आवाहन महिला मंच ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.




