
महिला महोत्सवानिमित्त अमळनेर महिला मंच ट्रस्टचा उपक्रम…
अमळनेर:- येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील भिंतींवर वारली पेंटिंग स्पर्धेतून साकारले रामायण साकारले गेले असून सावित्रीबाई फुले महिला महोत्सव निमित्त अमळनेर नगरपरिषद व अमळनेर महिला मंच ट्रस्टने हा उपक्रम केला आहे.

महिला महोत्सवात दरवर्षी महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी नवनवीन स्पर्धा होत असतात यंदा पेंटिंग तथा चित्र कलेला वाव देण्यासाठी वारली स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धेसाठी “रामायण” हा विषय असल्याने ही चित्र कायमस्वरूपी अनेकांना पाहण्यासाठी उपलब्ध असावे यासाठी श्री शिवाजी महाराज उद्यानात ही स्पर्धा घेण्यात आली. यात सुमारे 30 महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला सर्वांनीच दिलेल्या विषयानुसार वेगवेगळे उत्कृष्ट रामायण मधील विविध प्रसंग भिंतीवर साकारले. या स्पर्धेसाठी बाहेर गावाहून परीक्षक बोलविण्यात आले होते. त्यांनी परीक्षण करून निकाल आयोजकांकडे दिला असून 3 तारखेला महिला महोत्सवात हा निकाल घोषित करून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
सदर स्पर्धेसाठी महिला मंच अध्यक्ष डॉ अपर्णा मुठे,सौ कांचन शाह,डॉ मंजुश्री जैन, जासमीन भरुचा,प्रा शिला पाटील, पद्मजा पाटील, उज्वला शिरोडे, योगिता पांडे व महिला सदस्यांनी परिश्रम घेतले.




