
बाजार समितीचे संचालक नितीन पाटील यांनी स्वखर्चाने राबवला उपक्रम…
अमळनेर:- अपघात टाळण्यासाठी बाजार समितीत आलेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरला स्वखर्चाने रिफ्लेक्टर लावत बाजार समितीचे संचालक नितीन पाटील यांनी आगळावेगळा समाजोपयोगी उपक्रम राबविला आहे.

शेतीकामासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरच्या मागील ट्रॉलीस रिफ्लेक्टर नसल्याने मागून येणाऱ्या वाहनांना ट्रॅक्टर असल्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात घडतात, अशा अपघातांना आळा बसावा यासाठी बाजार समितीचे संचालक नितीन बापूराव पाटील यांनी स्वखर्चाने बाजार समितीत धान्य विक्रीसाठी आलेल्या ट्रॅक्टर सारख्या वाहनांना आणि बैलगाडीला रेडियम रिफलेक्टर लावले. यावेळी सभापती अशोक आधार पाटील, संचालक प्रा सुभाष पाटील, सुरेश पाटील, सोनू भिल, समाधान धनगर, ऋषभ पारेख उपस्थित होते. नितीन बापूराव पाटील हे गडखांब ग्रुप पंचायतीचे सरपंच असून त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त हा आगळा वेगळा उपक्रम स्वखर्चातून राबवल्याने सभापती अशोक पाटील यांनी त्यांचे कौतुक केले. इतकेच नव्हे गडखांब गावातील सर्व बैलगाड्याना देखील रेडियम रिफ्लेक्टर लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.




