
अमळनेर:- तालुक्यातील खडके येथून एक महिला व तिचा लहान मुलगा दोघे बेपत्ता झाल्याची तक्रार अमळनेर पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली आहे.

तालुक्यातील खडके येथील प्रमिला कपिलदेव पाटील (वय २४) व त्यांचा मुलगा प्रसाद कपिलदेव पाटील (वय दीड वर्ष) हे ३१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास अमळनेर येथे दवाखान्यात जात असल्याचे सांगून खडके येथून बसमध्ये अमळनेर जाण्यासाठी बसले. मात्र सायंकाळपर्यंत घरी न आल्याने कुटुंबाने त्यांची शोधाशोध केली असता ते कुठेही सापडले नाहीत. कपिलदेव पाटील यांच्या फिर्यादीवरून पत्नी व मुलगा हरवल्याची तक्रार अमळनेर पोलिसात करण्यात आली असून पुढील तपास स.फौ. संजय पाटील करत आहेत.




