
अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांचे प्रतिपादन…
अमळनेर:- मराठ्यांनी समाजाचे काम करताना चष्मे बदलले पाहिजे, इतिहासाच्या भ्रमात राहू नका. मराठा समाजाने काय कमावले, काय गमावले याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. नवे बदल स्वीकारले पाहिजे जीवनाची परिक्रमा बदलायची आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी अमळनेर येथील मराठा मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात केले.

मराठा मंगल कार्यालयात मराठा महासंघाचा ‛गरज आहे विचार मंथनाची, शिक्षण, नोकरी रोजगार व नवी पदाधिकारी निवड कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात मराठ्यांनी पारंपरिकतेवर भर देत सर्वात जास्त जमिनी विकल्या आहेत. आज मराठा जॉबलेस, लँडलेस आणि पॉवरलेस देखील झाला आहे. व्यासपीठावर युवक मराठा महासंघाचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष मंगेश निकम, सरचिटणीस अमोल निकम, मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष जयवंतराव पाटील, मानद सचिव विक्रांत पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील, चंद्रकांत काटे, दिव्यांक सावंत, किशोर पाटील हजर होते.
प्रास्ताविक विक्रांत पाटील यांनी केले. अमोल निकम, जयवंतराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले. कार्यक्रमास जिल्हा बँकेच्या माजी संचालिका तिलोत्तमा पाटील, सुलोचना वाघ, राजेंद्र देशमुख, स्वप्नील पाटील, परेश शिंदे, डॉ प्रशांत शिंदे, मयूर पाटील, देविदास सोनवणे, रावसाहेब पाटील, दर्शन पाटील, दीपक शिसोदे, संजय सोनवणे, संजय पुनाजी पाटील, स्वप्ना पाटील, सविता अहिरे, कृपाली पाटील, रंजना पाटील, प्रतिभा पाटील, माथाडी कामगार नेते भगवानराव पाटील, दर्शना पवार, एस एम पाटील, महेश पाटील, सचिन वाघ, गौरव पाटील, विलास पाटील, गोकुळ बोरसे, भूषण भदाणे, अनिल पाटील, दिनेश साळुंखे, डॉ. आर एस सोनवणे हजर होते.




