
अमळनेर:- आपल्या वाढदिवशी सापडलेला मोबाईल प्रामाणिक पणे परत करून गुलामनबी यांनी सत्कार्य केले असून सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

ताडेपुरा येथील रहिवासी शुभम अनिल पवार यांचा ३५ हजार रुपये किमतीचा नवा मोबाईल बोरी नदीच्या फरशी पुलावर हरवला होता. तो गुलाम नबी यांना सापडल्याने गुलामनबी यांनी ताबडतोब मोबाईल घेऊन पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांना कळवले. फोन मालकाचा शोध घेऊन त्याला पोलीस स्टेशनला बोलावून मोबाईल परत करण्यात आला. आपल्या वाढदिवसाला एक सत्कार्य झाल्याची भावना गुलाम नबी यांनी व्यक्त केल्या. यावेळी माजी नगरसेवक नरेंद्र संदानशीव, सोनू बिऱ्हाडे, शरद पाटील, सुनील पाटील हजर होते.




