इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धेचे आयोजन..
अमळनेर:- तालुक्यातील मारवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रशेखर साळुंखे व ललिता साळुंखे ह्या उपस्थित होत्या. त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य रजनी गुरव ह्या प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमास उपस्थित होत्या. याप्रसंगी इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांचे वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात एकूण 26 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात प्रथम क्रमांक कुमारी जान्हवी हेमकांत साळुंखे, द्वितीय क्रमांक दिव्यानी समाधान शिंदे व तृतीय क्रमांक रुष्वी अरुणकुमार साळुंखे यांनी पटकावला तसेच मंथन चंद्रकांत साळुंखे व मनस्वी किशोर साळुंखे यांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका स्वाती पाटील यांनी केले. प्रास्ताविक दिनेश मोरे यांनी केले. या स्पर्धेचे परीक्षण मुख्याध्यापिका मनीषा निकम यांनी केले. तसेच या कार्यक्रमास सर्व शिक्षकांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी राबवला. या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना व निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली. सदर बक्षिसे ही ग्रामपंचायत सदस्य रजनी गुरव यांच्या सौजन्याने देण्यात आली. या दोघांचे शाळेच्या वतीने आभार व ऋण व्यक्त करण्यात आले. तसेच याप्रसंगी सावित्रीबाई दत्तक पालक योजनेअंतर्गत दीक्षू किरण पवार, आस्था निंबा भामरे व प्रगती मोहन गुरव यांना धनादेश देण्यात आला.