
अमळनेर:- शहरातील स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल [सी.बी.एस.ई .]येथे 3 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले” यांच्या जयंतीनिमित्त ‘बालिका दिवस’ साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक विनोद अमृतकर व सर्व शिक्षक वृंद यांच्या हस्ते ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ‘यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शाळेतील शिक्षक प्रशांत कापडणे यांनी बालिकादिनानिमित्त सावित्रीबाईंच्या जीवनपटाविषयी तसेच सामाजिक कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यानंतर राहुल पाटील यांनीही अगदी मार्मिक शब्दात सावित्रीबाई फुले यांच्या विषयीची माहिती विद्यार्थ्यांना पटवून दिली. तसेच इयत्ता चौथीतील कु उर्वी शेलकर व सुहानी पाटील या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई यांच्या कार्याविषयीची माहिती मनोगतातून व्यक्त केली. तसेच शाळेचे मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी बालिका दिवसाचे महत्त्व सांगून सावित्रीबाई यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शेवटी कार्यक्रमाची सांगता “राष्ट्रगीताने” करण्यात आली.




