
अमळनेर:- नवीन वर्ष २०२४ च्या पहिल्या दिवशी जायंटस ग्रुप ऑफ अमळनेरतर्फे अंबर्षी टेकडीवर वृषारोपण करण्यात आले.

इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला दिवस स्मरणात रहावा म्हणून 24 वृक्ष अंबर्षी टेकडीवर लावण्यात आली. यावेळी कार्यक्रमात उपस्थित जायन्ट्स ॲड. राजेंद्र चौधरी, राजेंद्र पाटील, महेश पाटील, डॉ. महेश पाटील, भटू पाटील, रमेश महाजन आणि सुनील पंडितराव पाटील आदी उपस्थित होते.




