अमळनेर:- अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती काम करणाऱ्या मयत हमालाच्या पत्नीस विम्याच्या रकमेचा धनादेश सभापती अशोक पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
तालुक्यातील बहादरवाडी येथील राहणारे दिलीप प्रकाश पाटील हे बाजार समितीत हमाल म्हणून कार्यरत होते. मागील वर्षी १९ जानेवारी २०२३ रोजी त्यांचे अपघातात निधन झाले होते. बाजार समितीत सर्व हमाल, मापाडी व कामगारांचा यांचा ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचा वीमा काढण्यात आला असून त्या वीमा कंपनीचा पाठपुरावा करण्यात येवून ६ जानेवारी रोजी सभापती अशोक आधार पाटील यांच्या हस्ते मयत हमाल यांच्या पत्नी ज्योती पाटील यांना दोन लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी बाजार समिती संचालक समाधान धनगर, शरद पाटील, भाईदास भील, विजय पाटील, हमाल मापाडी संघटनेचे भगवान कोळी, महादू पाटील, प्रभाकर पाटील, वसंत भोई, लक्ष्मण पाटील आदी उपस्थित होते.