अमळनेर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल…
अमळनेर:- घरमालक यात्रेला गावी गेलेले असताना अज्ञात चोरट्याने घराच्या मागच्या दाराचा कडीकोंडा तोडून देव्हाऱ्यातील दागिने चोरून नेल्याची घटना ४ ते ७ जानेवारी दरम्यान घडली.

गुलाबराव त्र्यंबक पाटील हे ४ रोजी सायंकाळी आपल्या कुटुंबासह रणाईचे येथे श्रीकृष्णाच्या यात्रेला गेले होते. दिनांक ७ रोजी गावाहून परत आल्यावर त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. देव्हाऱ्यातील देवाला केलेले चांदीचे ७ हजार रुपयांचे टोप, डोळे व लॉकर मध्ये ठेवलेले पाच हजार रुपये रोख असा १२ हजार रुपयांचा माल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. अमळनेर पोलिसात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.




