
अमळनेर:- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा केंद्र प्रताप महाविद्यालयात दि.०९ जानेवारी २०२४ पासून बी.ए.,बी.कॉम पुनर्परीक्षा व सत्रपरीक्षा सुरू झाल्या आहे.

परिक्षा दोन सत्रात होणार असून सकाळी १०:३० ते ०१:३० व दुपारी ०२:३० ते ०५: ३० या वेळेत पेपर आहेत. पेपरमध्ये एम.बीए., एम.सी.ए., डी.सी.जे., डिप्लोमा इन स्टॅट, बाल संगोपन, एम.ए. मराठी,हिंदी, इतिहास विविध विभागांच्या परीक्षेत वेगवेगळ्या दिवशी १२ परीक्षा केंद्रांची विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट होणार आहेत.
यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने बहिस्थ परीक्षक म्हणून प्रा.डॉ. आर.एस.पाटील सर यांची नेमणूक केलेली आहे. त्यांनी दि. ०८ जानेवारी रोजी सकाळी १०:०० वाजता अंतर्गत व बहिस्थ पर्यवेक्षक यांच्या समवेत कनिष्ठ पर्यवेक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले व कॉपीमुक्त परीक्षेसंबंधी सूचना दिल्या. तसेच केंद्रप्रमुख प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.ए.बी. जैन सर व केद्र संयोजक प्रा.पराग पाटील यांनीही कॉपीमुक्त परीक्षेसाठी सूचना करून तोतया (डमी) विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विद्यार्थ्याचे आयकार्ड व फोटोप्रूफ चेक करावे अशा सूचना सुपरवायझर यांना केली.
याप्रंसगी सहाय्यक पर्यवेक्षक प्रा. किरण पाटील, प्रा.अवित पाटील, सहाय्यक राजेंद्र गुजराथी,तांत्रिक सहाय्यक तृषाल पाटील,कनिष्ठ पर्यवेक्षक प्रा. योगेश वाणी, प्रा. सी.आर. पाटील प्रा आर.एस. महाजन, प्रा. विनोद माळी, प्रा. गोपाल पाटील, स्वप्निल पाटील, अजय पाटील उपस्थित होते.




