
अमळनेर:- येथील जी.एस. हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. एस. पाटील यांना महाराष्ट्र टिचर्स असोसिएशनतर्फे राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार सोहळ्यात आदर्श मुख्याध्यापक म्हणून गौरविण्यात आले.

महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन यांच्यातर्फे ७ रोजी धुळे येथे सन्मान कर्तृत्वाचा अंतर्गत राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल चे मुख्याध्यापक बी.एस.पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. मागील ३० वर्षांपासून शाळेच्या एनसीसी विभागाची कमान त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली आहे.शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत,धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्याच्या राज्यध्यक्षा शुभांगी पाटील यांच्याहस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
पुरस्कार मिळाल्याबद्दल खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे,कार्योपाध्यक्ष प्रदीप अग्रवाल, जी.एस. हायस्कूलचे चेअरमन हरी भिका वाणी तसेच सर्व संचालक मंडळाने मुख्याध्यापक बी.एस. पाटील यांचे अभिनंदन केले आहे.




