
न्यायालयाने सुनावली ११ तारखेपर्यंत पोलीस कोठडी…
अमळनेर:- लोंढवे येथील चाकू हल्ल्यातील प्रमुख आरोपी सोनू उर्फ संदीप पारधी याला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून सर्व आरोपींना न्यायालयाने ११ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
लोंढवे येथील ढाब्यावर पिण्याच्या पाण्यावरून वाद होऊन जानवे येथील संदीप उर्फ सोनू पारधी यांच्यासह अजय पारधी, जगन्नाथ पारधी यांनी मालक मनोहर पाटील यांच्यासह पवन धनगर, योगेश पाटील, काळू भिल यांच्यावर चाकू हल्ला केला होता. पोलीस निरीक्षक विजय शिंदे व त्यांच्या पथकाने अजय व जगन्नाथ दोघांना त्याचदिवशी अटक केली होती. सोनू फरार होता. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला पोलीस उपनिरीक्षक अक्षता इंगळे यांनी न्या. येलमाने यांच्या न्यायालयात हजर केले असता न्या. येलमाने यांनी ११ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी पकडण्यात आलेले अजय पारधी याला सुद्धा ११ पर्यंत पोलीस कोठडी व जगन्नाथ पारधी याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.





